गडचिरोली प्रतिनिधी । तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदू पत्त्यासह ट्रक पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना आज दहा जून रोजी अल्लापल्ली – आष्टी मार्गावर आलापल्लीजवळ घडली. ट्रकमध्ये जवळपास 30 लाखांचा तेंदूपत्ता होता अशी माहिती आहे. सध्या जिल्ह्यातून तेंदूपत्त्यची वाहतूक केली जात आहे.आज अशाच एका ट्रकने वेलगुर येथून तेंदूपत्ता घेऊन जात असताना विज तारांचा स्पर्श झाल्याने अचानक पेट घेतला.
चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेत उभा केला. आगीने कवेत घेतल्याने काही वेळातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. यामुळे कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये उंच उंच पोती भरून वाहतूक केली जात आहे
त्यामुळे विजेच्या विजेच्या तार तुटत आहेत वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे आणि भर रस्त्यावर आग लागण्याचे प्रकार वाढत असल्याने शासकीय मालमत्तेचे सुद्धा नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.