Breaking News : तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

नागपूर प्रतिनिधी | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. आयुक्तांना कोरोना झाल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पाश्वभूमीवर तुकाराम मुंढे हे सतत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत होते. सणांच्या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे आणि लोकांनी कमीत कमी बाहेर पडावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत होते. त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय.

तुकाराम मुंढे यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मला सध्या कुठलेही लक्षणं नाहीत त्यामुळे मी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या सर्व नियम मी पाळतो आहे. गेल्या १४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कृपया टेस्ट करून घ्यावी. आपण नक्की जिंकू”. असं ट्विट त्यांनी केलंय.