तुळजापूर प्रतिनिधी | भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजा भावांचीचे दर्शन घेतले आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि राष्ट्र्वादीतील नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. कारण काँग्रेसच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास राहिला नाही. त्याच प्रमाणे काँग्रेसने पाच कार्याध्यक्ष नेमले त्यातील एक कार्याध्यक्ष भाजपमध्ये येईल असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील
राज्यात काही भागात पावसाचे दुर्भिक्ष आहे त्या भागात राज्य शासन कुत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे तो यशस्वी होण्यास तुळजा भवानीने आशीर्वाद द्यावा कारण विज्ञानापेक्षा देव श्रेष्ठ आहे असे मी मानतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसात चांगला पाऊस पडेल असे सांगितले आहे. मात्र त्यांच्या अंदाजाची वाट नबघता आम्ही कुत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी करणार आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून दर्शनाला आलो असे नाही मी नेहमीच देवांचे आशीर्वाद घ्यायला इकडे दर्शनाला येत असतो. तसेच मी कोल्हापुरात गेलो तर आंबाबाईचे दर्शन घेतल्या शिवाय घरी जात नाही असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.