“तुनिषा शर्माचा मृत्यू हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार” गिरीश महाजनांचा दावा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – दोन दिवसांपूर्वी Tv अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषा शर्माचा (Tunisha Sharma) कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक करून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता भाजपा आमदार व मंत्र्यांकडून हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय असल्याचा दावा करण्यात येत आहे.

गिरीश महाजन यांचा दावा
भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, “हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणं वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.” असे म्हंटले आहेत.

आतापर्यंत कोणत्याही अन्य प्रकाराची, ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादबाबत काही ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे (Tunisha Sharma) फोन ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त(एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

तुनिषाच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे लवकरच समोर येईल.यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..