नवी दिल्ली । सीरियात बाल सैनिकांची भरती करणार्या सशस्त्र मिलिशियाला ऑपरेशन, उपकरणे आणि आर्थिक पाठबळ मिळाल्याबद्दल टीका करणाऱ्या मानवी तस्करीच्या अमेरिकेच्या अहवालाचा तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, बाल सैनिकांचा वापर करणार्या 15 देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. सीरियन कुर्दिश अतिरेक्यांसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याकडे लक्ष वेधत अमेरिकेचे दुहेरी निकष आणि ढोंगीपणाबाबतही आरोप या निवेदनात केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला. त्याच दिवशी तुर्कीची प्रतिक्रियाही आली. या लिस्टमध्ये इतर देशांच्या नावांमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यांनीही याचा इन्कार केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने याला वस्तुस्थितीची चूक म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेला या आरोपांचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे.
तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते हा दावा पूर्णपणे नाकारत आहेत आणि त्यांचे रेकॉर्ड शुद्ध आहेत. सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस अंतर्गत बालकांची भरती आणि शोषण करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचा अहवालही या निवेदनात नमूद करण्यात आलेला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने बाल सैनिकांच्या वापराबद्दल तुर्की आणि अन्य 14 देशांचा हवाला दिला. अशा या लिस्टमध्ये नाटोच्या सहयोगी संघटनेस पहिले स्थान देण्यात आले. जेव्हा अमेरिका एखाद्या देशाला या लिस्टमध्ये स्थान देते, तेव्हा तो देश अनेक अमेरिकन कार्यक्रमांपासून वंचित राहतो. पाकिस्तान म्हणतो की, अमेरिकेने हा अहवाल प्रकाशित करण्यापूर्वी कोणत्याही संघटनेशी सल्लामसलत केलेली नाही.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा