Turmeric Coffee कधी पिलाय का? फायदे वाचून व्हाल खुश

Turmeric Coffee
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉफी (Coffee)पिणे कोणाला नाही आवडत? जवळपास सर्वचजण कॉफी पिण्याचे शौकीन असतात. परंतु जर तुम्ही हेल्दी (Healthy) कॉफी बनवण्याचा विचार करत असाल तर त्यात हळद टाकून आपण पिऊ शकता. हळद कॉफी म्हणजेच Turmeric Coffee शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. आज आपण जाणून घेऊया हळदीची कॉफी नेमकी बनवायची कशी आणि याचे आपल्याला कोणते आरोग्यदायी फायदे होतात याबाबत….

अशी बनवा Turmeric coffee-

हळदीची कॉफी बनवण्यासाठी आधी कॉफी फेटून ठेवा आणि मग दूध वेगळे बनवा. या दुधात हळद मिसळून गरम ठेवा. आता कॉफी फेटल्यानंतर त्यात हे दूध घाला. आणि ही Turmeric coffee प्या.

Turmeric Coffee

काय होतात फायदे- 

जर तुम्हाला हृदयविकार आणि मधुमेहापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि दीर्घायुष्य देणारे ड्रिंक घ्यायचे असेल तर हळद मिश्रित कॉफीपेक्षा चांगले पेय दुसरे कोणतेही असू शकत नाही.

हळदीची कॉफी अॅसिडिटी कमी करण्यासाठी गुणकारी आहे. ते तुमची आम्लपित्त समस्या कमी करण्यास मदत करते. याशिवाय ही कॉफी हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शोषून घेण्यासही मदत करते. यामुळे हळदीचे फायदे थेट आपल्या शरीराला मिळू शकतात.

Turmeric Coffee

कर्क्युमिन सारखे अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करू शकतात. तसेच, कर्क्युमिनमध्ये तुमच्या शरीरातील पेशी निरोगी ठेवण्याचे आणि त्यांच्या वाढीस चालना देण्याचे गुणधर्म आहेत. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यातही हे उपयुक्त आहे. तर, या सर्व फायद्यांसाठी हळदयुक्त कॉफी नक्कीच वापरून पहा.

हळदीच्या कॉफी मुळे कर्क्युमिन सारखे अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सला बेअसर करू शकतात. तसेच, कर्क्युमिनमध्ये तुमच्या शरीरातील पेशी निरोगी ठेवण्याचे आणि त्यांच्या वाढीस चालना देण्याचे गुणधर्म आहेत.

Turmeric Coffee

आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यातही हळदीची कॉफी फायदेशीर ठरू शकते.

शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी हळद कॉफी उपयुक्त आहे. तसेच, याचे दाहक-विरोधी गुणधर्म हाडे आणि सांध्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी हळद कॉफी नक्की प्यावी.