मुंबई । अभिनेता सुशांत सिह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कलाविश्व एका मोठ्या वादात सापडलं असताना आणखी एका अभिनेत्यानं आता आत्महत्या केली आहे. टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही.
मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
“आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे”, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘मिड डे’ला दिली. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”