कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि वाई तालुक्यातील देगांव यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्ल मान्याचीवाडी, देगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत आभार मानले आहेत.
काल ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील एकूण 313 पंचायतींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये 2021 (पडताळणी वर्ष 2019-20) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला ऊत्कृष्ट कार्यासाठी ऑनलाइन रोख रकम देऊन सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये रोख ऑनलाइन माध्यमाने खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर राज्यातील 14 ग्रामपंचायतीच्या कामाच्या गुणवत्तेनुसार या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यामध्ये मान्याचीवाडी (ता. पाटण), देगांव (ता. वाई) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या 14 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान. नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार मान्याचीवाडी जि. सातारा गावाने पटकावला आहे. पुरस्कार प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाचे जाहीर आभार व जिल्हावासीयांचे अभिनंदन. pic.twitter.com/TCbI5ZnXck
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) April 25, 2021
खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी ट्विट केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे. सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान. नानाजी देशमुख राष्ट्रीय गाैरव ग्रामसभा पुरस्कार मान्याचीवाडी गावाने पटकवला आहे. पुरस्कार प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाचे जाहीर आभार व जिल्हावासीयांचे अभिनंदन.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा