दुचाकी चोराकडून सव्वातीन लाखांच्या १२ दुचाकी जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील अट्टल दुचाकी चोर धनंजय उर्फ धन्या पिंपळे (३०) यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी धनंजय उर्फ धन्या याच्या ताब्यातून सव्वातीन लाखांच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकीचोर धनंजय उर्फ धन्या पिटोरे-पिंपळे हा बुधवार २४ रोजी रांजणगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना दिली होती. ही माहिती मिळताच आरोपी धनंजय उर्फ धन्या यास पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून त्यास शिताफीने जेरबंद केले.

आरोपी धनंजय यास पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने दोन-चार दिवसांपूर्वीच रांजणगाव परिसरातील शिवनाथ जाधव यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, ई.पी.०९९५) चोरल्याची तसेच गेल्या ३ वर्षापासून एमआयडीसी वाळूज परिसरातून काही दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. पोलीस कोठडीत आरोपी धनंजय याने वाळूज एमआयडीसी परिसरातून तब्बल १२ दुचाकी चोरुन या दुचाकी परजिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार कय्युम पठाण, गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलीस नाईक प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, शिपाई नवाब शेख, विनोद परदेशी, मनमोहन कोली, हरिकराम वाघ, रेवन्नाथ गवळे, दीपक मतलबे, धर्मराज गायकवाड आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment