सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 1 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 72 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 25 हजार 43 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 29 हजार 197 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 1 हजार 46 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2962 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी दिवसभरात 45 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन लावण्यात आलेला असतानाही बाधितांचा आकडा कमी होत नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यात लसीकरणाला मोठी गर्दी होताना दिसत आहे. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करताना दिसत असला तरी नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे बनले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba