Wednesday, February 1, 2023

ट्विस्ट ः नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी, अन्यथा ममता दिदी कोर्टात जाणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असणाऱ्या तृणमूल काॅग्रेसच्य ममता बॅंनर्जी 1 हजार 200 मतांनी विजयी झाल्या होत्या नंतर भाजपाच्या उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचा 1 हजार 957 मतांनी विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. नंदीग्रामच्या या जागेवर मिनिटांमिनिटाल नवनविन ट्विस्ट येत आहे. यावेळी ममता बॅंनर्जी यांनी निकाल मान्य करतो, मात्र आपण कोर्टात दाद मागण्यासाठी जाणार असून मतमोजणी परत घेण्याची मागणी तृणमूल काॅंग्रेसच्या ममता बॅंनर्जी यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव तर तृणमूल काॅंग्रेसचा विजय निश्चित दुपारपासूनच ठरलेला होता. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅंनर्जी यांची जागा सुरूवातीपासून पिछाडीवर होती. शुभेंदू अधिकारी हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था तृणमूल काॅंग्रेसची झाली आहे. अखेर या निवडणुकीचा निकालही ममता दिदींनी मान्य केला आहे.

- Advertisement -

शेवटच्या फेरीत कोण बाजी मारणार, ममता बॅंनर्जी कि सुवेंदू अधिकारी या निकालाकडे लोक श्वास रोखून पहात होते. यामध्ये सुरूवातीला ममता दिदी विजयी झाल्याचे सांगण्यात आले तर नंतर शुभेंदू अधिकारी हे विजयी झाले असल्याचे घोषित करण्यात आहे. त्यामुळे तृणमूल काॅंग्रेसने निकालावर आक्षेप घेतला, यावेळी ममता दिदींनी कोर्टात जाणार असल्याचे सांगत मतमोजणी परत घेण्याची मागणी केली.