काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट; बड्या नेत्याची एन्ट्री होताच दिग्विजय सिंह यांची माघार

Digvijay Singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट नवा ट्विस्ट आला आहे. गांधी घराण्याचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी आपली माघार घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले, मी काल खर्गेजींच्या घरी जाऊन विचारले की, तुम्ही उमेदवारी भरत असाल तर मी निवडणूक लढवणार नाही. त्यानंतर जेव्हा मला समजलं की ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत तेव्हा मी आज पुन्हा त्यांच्या घरी गेलो आणि सांगितलं की , तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुमच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा मी विचारही करू शकत नाही. आता त्यांचा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने मी त्यांचा प्रस्तावक असेन. त्यामुळे दिग्विजयसिंह हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.

दरम्यान, यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. गेहलोत हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते मात्र राजस्थान मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी मुळे त्यांनी माघार घेतली आणि सोनिया गांधींची माफीही मागितली. आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे.