हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ट्विटवर चुकीची किंवा दिशाभूल करणारी पोस्ट केल्यास युजर्सना ट्विटरकडून आता इशारा देण्यात येणार आहे. ही सेवा 5 मार्च 2020 पासून सुरु होणार आहे. फेक न्यूजला आळा घालणे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. चुकीची दिशाभूल करणारी माहिती ट्विटरवरून काढून टाकण्यासाठी ट्विटरने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
ट्विटरने सांगितले की, ट्विटर लवकरच ट्विटरच्या व्यासपीठावर ट्विटची लेबलिंग करण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटर ‘दिशाभूल करणारी किंवा छेडछाड’ करणारी माहिती ओळखेल. त्याचबरोबर लोकांना चुकीची माहिती देणारी अशी ट्वीट काढून टाकण्यासाठीही पावले उचलली जातील.
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सोशलमिडीयावरून चुकीची माहिती प्रसारित केली जाते. निवडणूक असेल तर मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अशी माहिती फिरवली जाते. फेसबुकने अशी माहिती रोखण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. आता ट्विटरने देखील या युजर्सची दिशाभूल करणाऱ्या खोट्या माहिती विरोधात पाऊल उचलले आहे. चुकीची किंवा दिशाभुल करणारी माहिती शेअर केल्यास आता ट्विटरकडून सूचक इशारा देण्यात येणार आहे.