विदेशी मद्य तस्करी करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारी आलिशान मोटार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने पुणे ते बंगळुरू महामार्गावर तावडे हॉटेलसमोर अडवली. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 93 हजार 600 रुपयांचे मद्य (smuggling foreign liquor) व कार असा सुमारे 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. योगेश धनाजी गायकवाड आणि विनोद उद्धव पाटकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेलनजीक उचगाव परिसरातून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार काल, बुधवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने महामार्गावर उचगाव परिसरात सापळा रचला. यावेळी एक आलिशान मोटार गाडीचा संशय आल्याने पोलिसांनी गाडी अडवली. यानंतर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी विदेशी मद्याने (smuggling foreign liquor) भरलेले 180 मिलीचे विविध कंपन्यांचे 50 बॉक्स असे सुमारे 3 लाख 93 हजार 600 रुपये किमतीचे मद्य (smuggling foreign liquor) व मोटारकार असा एकूण सुमारे 17 लाख 3 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी (smuggling foreign liquor) अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी साथीदार सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दिशेने उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरू आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक गिरीषकुमार कर्चे, विजय नाईक, जवान सचिन कळे, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिवगारे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक पी. आर. पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट

अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!

Leave a Comment