सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील एकाच रूममध्ये दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. यामध्ये एकाने पेटवून घेतले तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून या तरुणांनी आत्महत्या का केली असावी याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नाही.
कोरेगावात दोन तरुणांनी एकाचवेळी एकाच रुममध्ये आत्महत्या करणे संशयास्पद असल्याने याबाबत तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.