रेल्वेची दोन म्हैशींना जोराची धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेचा अपघात झाला आहे. संगम माहुली येथे रेल्वे स्टेशन नजीक माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेने 2 म्हशींना धडक दिली आहे. रेल्वे पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेकडे जात असताना हा अपघात झाला. रेल्वेच्या चाकांमध्ये दोन्ही म्हशी अडकल्याने माल वाहतूक करणारी रेल्वे जागेवर उभी होती. या दुर्घटनेत एक म्हैस जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाली.

सातारा- कोरेगाव मार्गावर संगममाहुली येथे ही दुर्घटना घडली. म्हैस ठार झाल्याने रेल्वे खोळबून उभी राहिली होती. रूळावरून म्हैशीला बाजूला करण्यासाठी जेसिबीच्या साहाय्य घ्यावे लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर म्हैस बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

कोल्हापूरच्या दिशेला निघालेल्या या रेल्वेने दोन म्हैशींना जोराची धडक दिली. रेल्वे रूळावर म्हैशी आल्याने ही घटना घडली आहे. म्हैस जागीच ठार झाल्याने म्हैस मालकांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.