सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शर्यतीदरम्यान बैलगाडा आणि बैलजोडी विहिरीत पडून दोन बैलांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. विहिरीत बैलजोड्या विहरीत पडलेल्या असून अडकून राहिलेल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने मृत बैल बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान बैलगाडी चालकाने हलगर्जीपणा केल्याने दोन बैलांना जीव गमवावा लागला आहे. बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी असलेल्या विहीरीत बैलगाडा व बैलजोडी पडलेली आहे. विहीरीत पडलेले बैलाचा मृत्यू झाला असून अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली. तसेच बैलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच वाठार पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले असून त्यांनी आयोजकांवर होणार गुन्हा दाखल केलेला आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात व बैलगाडी शाैकिनांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे.