परभणी : हॅलो महाराष्ट्र – सावकाराकडून शंभर रुपये प्रति दिवसाप्रमाणे घेतलेल्या व्याजाचे पैसे परत करण्यासाठी लावलेल्या तागदा नंतर जिल्ह्यातील सोनपेठ मधील दोन युवकांनी विषारी औषध पिऊन क आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ मधील सोनखेड येथील सुनील पारवे आणि रितेश क्षिरसागर अशी आत्महत्या केलेल्या युवकांची नावे आहेत.
दोघांनी मिळून आरोपी सावकार अजय घुगे, सुनील मुंडे व हनुमंत घुगे यांच्याकडून शंभर रुपये प्रति दिवसाप्रमाणे व्याजावर पैसे घेतले होते .परंतु हाताला काम नसल्याने व्याजाचे पैसे परत देणे त्यांना शक्य होत नव्हते .सावकाराचा तगादा वाढल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे .
दरम्यान आत्महत्येपूर्वी हाताच्या दंडावर त्यांनी आरोपींची नावे लिहिली असल्याने आरोपीविरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम व इतर कलमा खाली गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात मात्र खळबळ माजली आहे.