औरंगाबाद | न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी व गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे.
याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पोलीस हवालदार शेख अफसर शेख इलोमोद्दीन (वय ५२), रत्नाकर पुंडलिक बोर्डे (वय ५0) या दोघांनी गुन्ह्याच्या तपासकामी ५ हजार रूपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट एसीबी कार्यालय गाठत तक्रार दिली.
पथकाने मागणीची शहानिशा करीत सापळा रचला व लाचेची रक्कम स्वीकारताना या दोघा हवालदारांना अटक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.