अमरावतीत दोन दिवस जनता कर्फ्यु; जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हा जनता कर्फ्यू शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ पर्यंत असेल. या काळात रूग्णालये व मेडिकलची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व सेवा बंद राहतील. शहरात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर राज्य सरकारनं काही क्षेत्र वगळता इतर ठिकाणी विविध सवलती लागू केल्या आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या पाहता येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असंही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment