व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शहरात मार्च अखेरपर्यंत येणार दोन डबलडेकर बस

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी दोन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस मार्चअखेरपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी दिली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस खरेदी करण्याची सूचना केली होती. स्मार्ट सिटी ने बसेस खरेदी ची तयारी केली असली तरी दीड वर्षांची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले. पांडेय यांनी पर्यटन मंत्र्यांना डबल डेकर बसेस मिळण्यात येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिली. स्मार्ट सिटीने दोन कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांनी कमीत कमी दोन डबलडेकर बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या बस प्राधान्याने पर्यटकांसाठी वापरण्यात येतील.

महामेट्रोच्या पथकाने शहराचा डाटा घेतला –
शेंद्रा एमायडिसी ते वाळुज पर्यंत एकच उड्डाणपूल आणि मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी बुधवारी महा मेट्रोचे एक पथक शहरात आले. या पथकाने काल स्मार्ट सिटीच्या नवीन कार्यालयात विविध शासकीय कार्यालयांकडून शहराचा डाटा जमा केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.