खळबळजनक! विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा परिसरातील एका विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळ एक विहिर आहे. या परिसराच्या बाजूला शेती असून विरळ वस्ती आहे. हा परिसरात भाविकांचे येणेजाणे असते.

आज दुपारी काही भाविक महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. भाविकांनी उत्सुकते पोटी जवळच्या विहिरीत पाहिले असता मृतावस्थेतील बिबट्या तरंगताना आढळून आला. त्यांनी लागलीच सर्पमित्र संघानंद शिंदे यांना संपर्क करून माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार हा बिबट्या दीड ते दोन वर्ष वयाचा असेल. तसेच एक दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा.