आता काय म्हणावे याला ! दोन मुलींनी घरात घुसून 30 वर्षीय तरुणाचा केला विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – आपण आतापर्यंत तरुणीचा विनयभंग झाल्याचे पाहिले असेल मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन मुलींनी चक्क 30 वर्षीय तरुणाचा विनयभंग केला आहे. या दोन मुलींनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. इतकंच नाही, तर त्याला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोन तरुणींसह त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन तरुणींनी एका मुलाच्या मदतीने 30 वर्षीय तरुणाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या दोन तरुणी एका मुलाला घेऊन 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या. वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून त्याचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणींनी त्या तरुणाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. ही घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत घडली आहे.

या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची संपूर्ण आंबेजोगाई शहरात चर्चा रंगली आहे. या आरोपी मुलींना अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी पीडित तरुणाने केली आहे.

Leave a Comment