इस्लामाबाद । भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून पाकिस्तानमध्ये भारतीय दूतावासातील दोन कर्मचारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. भारताने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. पाकिस्तानमधील इस्लाबाद येथे भारतीय दूतावास कार्यालय आहे. या कार्यालयात कार्यरत असलेले दोन कर्मचारी सोमवारी अचानक बेपत्ता झाले. अधिकारी बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी ही घटना समोर आली. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं बेपत्ता अधिकाऱ्यांचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान सरकारला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८.३० वाजल्यापासून या कर्मचाऱ्यांसोबतचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील तीन गुप्तहेरांना भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली होती. अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव होती. ते थेट आय़एसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in