सिंगापूर | दोन भारतीयांनी दिवाळी निमित्य बिना परवाना फटाके फोडले म्हणून सिंगापूर येथील लिटिल इंडिया या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली असून यासाठी त्यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होणार आहे. त्यांची नावे थियागु सेल्वराजु ( 29) आणि शिव कुमार सुब्रमण्यम (48) अशी आहे.
पर्यावरणाला धोका निर्माण होतो म्हणून देशाच्या सुप्रीम कोर्टाने यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध लादले आहेत. भारतात असे निर्बंध पहिल्यांदाच येत असले तरी इतर देशांमध्ये फटाके फोडण्याचे नियम आदी पासून आहे. सिंगापूरमध्ये फटाके फोडण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करून अशी परवानगी घेता येते. बिना परवाना फटाके फोडले तर या देशात कडक शिक्षा होऊ शकते.