टीम हॅलो महाराष्ट्र । येत्या २ फेब्रुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पापूर्वी तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये नेशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (National Insurance Company) आणि यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (United India Insurance Company)चे ओरियंटल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड(Oriental Insurance Company) मध्ये विलीनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, विमा कंपन्यांच्या विलीनीकरणाला अर्थमंत्र्यालायाने या तीन कंपन्यांच्या विलनीकरणाला सैद्धांतिक संमती दिली आहे. त्यानुसार अर्थसंकल्पापूर्वी किंवा नंतर कधीही या विमा कंपन्यांच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा करण्यात येऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकातामध्ये या तीन कंपन्यांच्या विलीनीकरणाला मजुरी देण्यासाठी नॅशनल इंश्योरेंस कंपनीच्या मंडळाची बैठक झाली. याबैठकीत विलीनीकरणाचा निर्णयाला मजुरी मिळाली. दरम्यान, नॅशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेडच्या मंडळाने विलीनीकरणाला मंजुरी देण्याआधीच ओरियंटल इंश्योरेंस कंपनी लिमिटेडच्या मंडळाने विलीनीकरणाला संमती दिली आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांची बैठक गेल्या शुक्रवारी पार पडली होती. या विलनीकरणात न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीचा सुद्धा समावेश आहे.
जेटलींनी केली होती विलीनीकरणाची घोषणा
वित्तीय वर्ष 2018-19 च्या अर्थसंकल्पावेळी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या तीन विमा कंपन्यांच्या विलिंकरांची घोषणा केली होती. मात्र या कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे विलीनीकरणाला उशीर झाला.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-‘
‘या’ कारणामुळं इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प