श्रीनगर वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सेना,सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरचे पोलीस यांची संयुक्त टीम यांनी मिळून हे ऑपरेशन पार पाडले.यात त्यांना यश मिळाले.सुरक्षारक्षकांकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशनसुरु आहेत.
शोपीयातील काही भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती, त्या भागाला त्यांनी घेराव घेतल्यानंतर रात्रभर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु होते. आता तो थांबला असला तरी परिस्थिती धोकादायकच आहे.
पाकिस्तानी गोळीबाराला प्रतिउत्तर देताना भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषे पलीकडील पाकिस्तानच्या पाच चौक्या उद्वस्थ केल्या होत्या. यामुळे पाकिस्तान सैन्याला याचा मोठा फटका बसला आहे.पाकिस्तानी सैन्य एलओसी नजीकच्या गावात लपून बसलेली आहे तेथील नागरिकांच्या घरात लपून भारतीय सेनेकडे गोळीबार करीत आहेत. जम्मू-काश्मिरजवळील एलओसी जवळील १२ ते १५ पाकिस्तानी चौक्यांवरून सतत गोळीबार सुरु आहे. यादरम्यान भारतीय सेनेने पाकिस्तानी सैन्याचे काही रेंजर्स ठार केले आहेत.
इतर महत्वाचे –
मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनावरून, अखेर मूकबधिर तरुणांचे आंदोलन मागे
PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???
तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटात सलमान खान