खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींकडून दोन पिस्टल व जिवंत राऊंड जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

मंगेश पोमन याचा खूनप्रकरणी वैभव सुभाष जगताप व ऋषिकेश पायगुडे यांना नाशिकमधून 14 जून रोजी शिताफीने सापळा रचून पोलिसांनी अटक केली होती. तो खून झाल्यापासून फरार होता. त्या दोघांवर मंगळवारी लोणंद पोलिसांनी कारवाई केली. तसेच दोघांना अटक केली. कारवाईनंतर त्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल, एक जिवंत राऊंड, मोटरसायकल असे साहित्य जप्त केल्याची माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी मंगळवारी दिली.

लोणंद पोलिसांनी मंगळवारी कारवाई करीत तडीपार असलेल्या ऋषिकेश पायगुडे याच्यावर पुणे येथे पोलिसांनी कारवाई करीत गावठी बनावटीचे दोन पिस्टल व एक जिवंत राऊंड, मोटरसायकल जप्त केली. त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर म्हणाले, ” सातारा जिल्ह्यातील वाठार बुद्रुक हद्दीतील नीरा उजवा कॅनॉलमध्ये दि. ८ जून रोजी मंगेश पोमन याचा खून झाल्याची घटना घडली होती. खूनप्रकरणी वैभव सुभाष जगताप व ऋषिकेश पायगुडे यांना नाशिकमधून 14 जून रोजी शिताफीने सापळा रचून पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश पायगुडे हा खून झाल्यापासून फरार होता. त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्या गुन्ह्यात वापरलेलय साहित्याबाबत माहिती दिली. त्याने गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल एक जिवंत राऊंड पल्सर मोटरसायकल असे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Leave a Comment