सांगली । सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील कैदेत असणारे आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून खिडक्यांचे गज वाकवून पलायन केले. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पळून गेलेले दोघेही आरोपी कोरोना बाधित आहेत. २३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी सातारा जिल्ह्यातील ट्रक चालकाला कोयत्याचा धाक दाखवून 47 हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटला होता.
या प्रकरणात शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दोघांना 17 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तत्पूर्वी त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया कैद्यांना शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे त्याठिकाणी दोघांना दाखल करण्यात आले. याठिकाणी एकूण दहा कैदी आहेत. त्यामध्येच राजू कोळी आणि रोहित जगदाळे हे दोघेही उपचार घेत होते. पण रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ज्यावेळी या कैद्यांच्या शिरगिणती करण्यात येत असतानाच खिडकीचे गज वाकवून या दोघांनी पलायन केले. दोघे पळून जातानाचे सीसीटीची कॅमेरामध्ये चित्रित झाले आहे. कैद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली. दोघा फरार कोरोनाबाधित कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना कारण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’