पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील औरंगाबाद-बीड हायवे रोडलगत असलेल्या गांधीली शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गारखेडा परिसरातील नुरानी मशिदीजवळ राहणारे अतीक अकील शेख (वय 19), नदीम नासेर शेख (वय 17) हे दोघे पोहण्यासाठी बीड बायपास गांधीली शिवारात गेले. दोघांनी पोहण्यासाठी तलावात उडी मारली. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडायला लागले. यावेळी त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र पोहता येत नसल्याने ते बाहेर येऊ न शकल्याने पाण्यात बुडाले.

दरम्यान घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे गारखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.