पारशिवनीत दोन दुचाकींची समोरासमोर झाली धडक, दोन जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये करंभाडजवळ दोन दुचाकींच्या सामोरासमोर झालेल्या धडकेत माजी जि. प. सदस्य कमलाकर मेंघर व प्रकाश सावरकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कमलाकर मेंघर हे आपल्या बाईकवरून करंभाड शिवारातील शेताकडे जात होते. तसेच करंभाडजवळ प्रकाश सावरकर हा निंबा येथील सूतगिरणी कंपनीकडून विरुद्ध दिशेने येत होता. प्रकाश कंपनीतून सावनेर ते पारशिवनी मार्गे या महामार्गावर अतिशय जलदगतीने येत होता. यावेळी प्रकाशला दुचाकी सुसाट असल्याने समोरील दुचाकीला पाहून त्याला वेग नियंत्रित करता आला नाही आणि त्यामुळे कमलाकर मेंघर व प्रकाश सावरकर यांची सूत गिरणीजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.

कमलाकर मेंघरे भाजपचे कार्यकर्ते
या भीषण अपघातात प्रकाश सावरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर कमलाकर मेंघर यांना वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या दोघांच्या मृतदेहांचे पारशिवनीतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. कमलाकर मेंघर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय होते.

अति वेगाने केला घात
मृत प्रकाश हा जास्त वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या सुसाट वेगामुळं प्रकाशचा तर जीव गेलाच शिवाय समोरून येणाऱ्या चालकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.