“ढोकळा कोण विकतो ते सोडा अगोदर वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?”; सोमय्यांचा राऊतांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राऊतांनीही केंद्रीयमंत्री अमित शहा आणि सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान आज सोमय्या यांनी पुन्हा सवाल उपस्थित करीत संजय राऊतांना आव्हान दिले आहे. “कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते अगोदर सांगा?, तुमच्या चोपड्यात एक दमडीही दिली नाही. मग गर्गन यांनी तुम्हाला पार्टनरशीप दिलीच कशी? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, शिवसेना खासदार अजय राऊत यांच्या कुटुंबातील कोणीही उद्योग-व्यवसायात नाही. असे ते सांगत आहेत. मग माझा राऊतांना सवाल आहे की, तुमच्यातील कोणी जर उद्योग-व्यवसायात नाहीत तर मग अशोक गर्ग यांनी तुम्हाला पार्टनरशीप कशी दिली?

मग संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत सेटलमेंट घडवून आणली आहे का? राऊत पडद्या मागे काय लपवत आहात. या वाईन उद्योगाची 100 कोटींची उलाढाल आहे. त्याचे लाभार्थी कोण आहेत? कोण ढोकळा विकतो, कोण केळी विकतो हे ढोंग बंद करा. पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगावे? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी राऊतांना विचारला आहे.