दुचाकी- पिकअपचा विचित्र अपघात; पेट घेतलेल्या वाहनामुळे दोन युवकांचा भाजून मृत्यू

अमरावती । परतवाडा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोन मुलांचा भाजल्याने मृत्यू झाला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे घडली.
निवृत्ती दीपक सोलव (१५) आणि राज अनंत वैद्य (१८, दोघेही रा. तळणी पूर्णा) असे भाजल्याने मृत झालेल्या युवकांची नावे आहेत.

घटनेच्या वेळी निवृत्ती सोलव व राज वैद्य हे अचलपूर तालुक्यातील तळणीपूर्णा येथून दुचाकीने आसेगावकडे जात होते. दरम्यान त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातानंतर पिकअप वाहनाच्या समोरच्या चाकात आलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला.

त्यामध्ये निवृत्ती सोलव याचा भाजल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राज वैद्य त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला.या ठिकाणी एकाचा मृतदेह जळून खाक झाला आहे तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्याची गर्दी होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like