पाटण तालुक्यातील आंबळे गावातील दोन तरूणांचा अपघातात मृत्यू

Accideant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे-बंगळूर महामार्गावरील शेंद्रेजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पाटण तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. सचिन बाळू दीक्षित (वय- 39) आणि वसंत विलास घाडगे (वय- 28, रा. आंबळे, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

साताऱ्यावरून सचिन दीक्षित आणि वसंत घाडगे हे दोघे दुचाकीवरून आंबळे गावी येत असताना रात्री नऊच्या सुमारास त्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने सचिन दीक्षित हे जागीच ठार झाले. तर वसंत घाडगे हे गंभीर जखमी झाला होता. जखमीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सचिन यांना दोन शाळकरी मुले आहेत.

वसंत यांना केवळ पाच महिन्यांची मुलगी आहे. सचिन हे आईच्या वडापावच्या गाडीला हातभार लावत होते. सचिन यांच्या जाण्याने दीक्षित कुटुंबाचा कर्ता आधार गमावला आहे. त्यांच्या मागे सहावी व आठवीत शिकणारी दोन मुले, पत्नी व आई आहे. वसंत सातारा येथील कूपर कंपनीत कामाला होते. त्यांना चार महिन्यांची चिमुरडी, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. दोन्ही युवकांचा ऐन तारुण्यातच मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली.