दीपक केसरकरांचा यु टर्न : मी ठाकरे कुटुंबीयांवर बोलणार नाही पण आदित्य ठाकरेंमुळे आमदार दुखावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शिंदे- भाजप सरकारमध्ये बंडखोरी केल्यानंतर प्रथम गटाचे प्रवक्तेपद अन् आता मत्रीपद मिळाल्यानंतर दीपक केसरकर सातारा येथे आले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यमांशी सरकार व ठाकरे कुटुंबिया विषयी प्रश्न उपस्थित करता. दीपक केसरकर यांनी आपण ठाकरे कुटुंबियांवर काहीही व यापुढे कधीच बोलणार नाही, असे म्हटले. परंतु तेथेच काही मिनिटांत आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेमुळे 50 आमदारा दुखावल्याचा आरोपही केला. त्यामुळे दीपक केसरकर यांचा याठिकाणी सोयीस्कर यु टर्न घेतलेला पाहिला मिळाला.

मंत्री दीपक केसरकर यांनी साताऱ्यात राजमाता कल्पनाराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, मी आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या कुठल्याही सदस्यावर कधीच बोलणार नाही. आपण ज्यावेळी राजकीय पक्षाचे नेते आणि मंत्री असताना वेगळी भूमिका असते. ज्यावेळी मंत्री असताना तुम्ही जनतेचे असता. त्यावेळी तुम्ही जनतेला काय दिल? हा महत्वाचा प्रश्न आहे. अन्यथा पक्ष चालवावा असे सांगत मी ज्यावेळेस राज्यमंत्री होतो ते मी अनुभवलं आहे. जो मनुष्य स्वतःला झोकून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतो तो संपूर्ण महाराष्ट्राचा होतो.

आदित्य ठाकरेमुळे आमचे 50 आमदार दुखावले : – दादरमध्ये प्रती शिवसेना भवन उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, प्रॉपर्टी बाळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. विचार ही एक मोठी संपत्ती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन बाळासाहेबांचे विचार संपत आले होते. त्यांना पुनर्जीवन पुन्हा देण्यात आलं ही वस्तुस्थिती आहे. पक्ष विचारावर चालतो. आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे. आम्ही आमचे विचार जपले आहेत. आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन झालो असतो तर तो बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव झाला असता. आदित्य ठाकरे जे- जे बोलत आहेत, त्यामुळे आमचे 50 आमदार दुखावले गेले आहेत. ते शब्द त्यांच्या तोंडून शोभत नाहीत.