भारतीय वंशाचा ‘हा’ खेळाडू रातोरात बनला UAE चा कॅप्टन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आशिया कपसाठी UAE ने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यूएई संघाच्या नेतृत्वात बदल झाला आहे. आधी या संघाच कर्णधारपद अहमद रजाकडे होतं. पण आता मूळ केरळच्या असलेल्या चुंदगापॉयल रिजवानकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रिजवानचा जन्म भारतातील केरळमध्ये झाला आहे. तो UAE ला स्थायिक झाला आणि आता तो तिथूनच क्रिकेट खेळत आहे.

रजा अजूनही कॅप्टन, पण….
रजा टी 20 संघाचा कॅप्टन नसला, तरी वनडे संघाच कर्णधारपद त्याच्याकडेच आहे. रजाची गणना यूएईच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्याच नेतृत्वाखाली UAE ची टीम मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली होती. त्याने 27 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यामध्ये त्याने 18 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.

UAE च्या टीम मध्ये दिल्लीच्या खेळाडूचा जलवा
UAE ने आशिया कपसाठी जो संघ निवडलाय, त्यात दिल्लीच्या एका खेळाडूचा समावेश आहे. चिराग सुरी असे या खेळाडूचे नाव आहे. चिराग 2014 पासून UAE च्या टीमकडून खेळत आहे. त्याने 2018 मध्ये वनडे डेब्यु केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी टी 20 मध्ये डेब्यु केला. तो सातत्याने यूएईच्या संघातून खेळत आहे. तो UAE च्या संघाचा प्लेइंग-11 चा भाग आहे. त्याने 24 टी 20 सामन्यात 655 धावा केल्या आहेत. यामध्ये सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

एशिया कप-2022 साठी UAEचा संघ
संयुक्त अरब अमिराती: चुन्दगापॉयल रिजवान (कॅप्टन), चिराग सुरी, अहमद रजा, अलीशान शराफू, मुहम्मद वसीम, साबिर अली, वृति अरविंद, बासिल हमीद, रोहन मुस्तफा, काशिफ दाऊद, कार्तिक मयप्पन, जहूर खान, जवार फरीद, आर्यन लाकड़ा, सुल्तान अहमद, जुनैद सिद्दीकी फहद नवाज.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर