सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
उदयनराजेंचा घरचा आहेर, अशा हेडलाईन्स असतात. मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वां आहेत, त्यांनी मला ठेवले असते का, परंतु आपले इथले विचारवंत म्हणतात यांनी पैसे खाल्ले. आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला असेल तर समोरासमोर यावे, तुम्ही ठिकाण निवडा आणि पुरावे द्यावेत. तेथे जमत नसेल तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉईंटवर या. आम्ही भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले तर तेथून माझा कडेलोट करा. नाहीतर ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांचा कडेलोट अजिंक्यताऱ्यावरून करावा, परंतु चॅलेंज घ्यायला तयार नाहीत, असे खुले आव्हान छ. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले आहे.
सातारा पालिकेच्या नुतन इमारतीच्या कामाची पहाणी केल्यानंतर उदयनराजेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपांना जशासतसे उत्तर दिले. खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्याची हद्दवाढ आम्ही मार्गी लावली. हद्दवाढ झाली नसती तरी सध्याच्या पालिकेच्या इमारतीची दयनिय अवस्था होती. जनता व अधिकाऱ्यांत संवाद होत नव्हता.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, आज मी सांगतो, साताऱ्यात आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व 50 जागांवर सातारा विकास आघाडीचे उमेदवार निवडूण येणार आहेत. उमेदवार लोकांसाठी झटणारे, काम करणारे देणार आहोत. भ्रष्टाचार त्याच्या काळात झाला होता, आमच्या काळात झाला नाही.
कोण दादा…म्हणत अजितदादांनाही टोला ः- कासच्या कामासाठी व हद्दवाढीतील भागासाठी प्रत्येक वेळी दादांनी पैसे दिले दादांन पैसे दिले असे सांगत आहेत. कोण दादा…. असा प्रश्न उदयनराजे म्हणाले, तुमच्या जाहिरनाम्यात याचा उल्लेखही नव्हता. तुम्हाला श्रेय घ्यायचे असेल घ्या. चांगले झाले की श्रेय घ्यायचे आणि फोटो प्रसिद्ध करायचे, हेच त्यांचे काम आहे. श्रेय मला मिळेल म्हणून त्यावेळच्या लोकप्रतिनिधींना आम्ही सांगितले होते हे सगळं तुमच्यामुळे झालं. हद्दवाढीमुळे वाढीव भाग पालिका क्षेत्रात आला आहे. त्यांना मागेच पाणी मिळाले असते.