सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशात आता संभाजी भिडे आणि उदयनराजे यांच्या भेटीमुळे राजकिय चर्चांना उधान आलं आहे.
भिडे यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतलीय. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आमची ही भेट राजकीय भेट नसून घरगुती असल्याचा खूलासा उदयनराजेंनी केलाय. भिडे गुरुजी ही घरातली व्यक्ती असल्याचं यावेळी भोसले म्हणालेत.
राजकीय निर्णय काय घेणार या बाबत बोलताना आता राजकारण सोडून तुमच्या सारख्या मित्राच्या बरोबर फिरावं म्हणतोय असे मिश्किल उत्तर उदयनराजेंनी दिलंय. मात्र भिडे आणि भोसले भेटीमुळे उदयनराजे, भाजपा प्रवेश आणि गुरुजी असं काही समिकरण तर नाही ना असा प्रश्न सातारकरांना पडलाय.
हे पण वाचा –
ठरलं! उदयनराजे अमित शहांच्या उपस्थितीत ‘या’ दिवशी करणार भाजपात प्रवेश
शिवस्वराज्य यात्रेतील उदयनराजे यांच्या गैरहजेरीवर अमोल कोल्हे म्हणतात
कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर
भाजप प्रवेशावर उदयनराजे म्हणतात
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात