कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
काल उदयनराजे यांचा वाढदिवस होता, पण पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं त्यांनी आधीच सांगितले होते. काल कराड येथे आयोजित शहिद जवानांच्या सन्मान सोहळ्यात हजेरी लावून त्यांनी आपला वाढदिवस शहिद जवानांच्या नावे केला. यावेळी उदयनराजे भोसले तसेच त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
शाहिद जवानांना या कार्यक्रमावेळी सर्वांनी मेणबत्त्या पेटून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रतीकात्मक जवान, एनसीसी कॅडेट तसेच शाहिद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते. उदयनराजे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सातारा जिल्ह्यातील जवानांना सन्मानित करण्यात आले आणि वीरमाता, वीरपत्नी यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘सीमेवर गेल्याशिवाय सैनिकांचा त्याग आणि शौर्य काय असते हे आपल्याला समजणार नाही.’ तसेच यावेळी कार्यक्रमास खुर्च्या रिकाम्या दिसल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली.अशा प्रकारे शाहिद जवानांसाठी त्यांनी आपला वाढदिवस शहिदांना श्रद्धांजली वाहून साजरा केला.
इतर महत्वाचे-
नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील