EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी उदयनराजे भोसले हे एक होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे. कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं त्यामुळे माझा इव्हिएमव विश्वास नाही अस मत भोसले यांनी जून महिण्यात कराड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. मात्र आता भोसले यांनीच भाजपात प्रवेश केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेत.

दरम्यान काल उदयनराजे यांनी आज मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयन राजे यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम