सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातार्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली असल्यचे बोलले जात आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारिखही पक्की झाली असून विधानसभेसोबतच होणार्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोण निवडणुक लढणार हे अजून गुलदस्त्यात आहे. अशात आता शरद पवार जर लोकसभेसाठी उभे राहिले तर मी निवडणुक लढणार नाही असं वक्तव्य उदयनराजे यांनी केले आहे. सातारा येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही असं म्हणत उदयनराजेंनी पवारांना एक अटही घातलीय. पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी असं भाोसले म्हणालेत.
पवार साहेब मला वडिलांच्या स्थानी आहेत. त्यांच्या बद्दलचा आदर काल, आज आणि भविष्यातही कायम राहील असं म्हणत उदयनराजे भावनिक झाले. यावेळी शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
सातारा लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेची ‘ही’ आहे भूमिका
राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल
EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…
पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?
कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर