पिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातार‍ा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पिळदार मिशी हे पुरुषार्थाचं लक्षण नाही तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण आहे असे म्हणत सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांना टोमणा मारला.

नरेंन्द्र पाटीलांनी माझी बदनामी करणं ताबडतोब थांबवावं असा सज्जड दम उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला. मी सर्वांच्या व्यासपीठावर जाणार पण नरेंन्द्र पाटीलांच्या व्यासपीठावर जाणार नाही असंही उदयनराजेंनी यावेळी सांगितलं.

उदयनरांजेंनी विकास कामे केली नाहीत हा विरोधकांचा आरोप बिनबुडीचा आहे असे सांगून आपण आत्तापर्यंत १८ हजार कोटींची विकास कामे मार्गी लावल्याचा दावाही उदयनराजेंनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी वाळू उपशासाठी येरवळे गाव दतक घेतल्याच्या पाटील यांनी केलेल्या आरोपाचे भोसले यांनी पुराव्यानिशी खंडण केले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

पवारांची जादू, उदयनराजे व शिवेंद्रराजे एक दिलाने निवडणूक लढवणार
नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Leave a Comment