सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीत मागील १५ वर्षांमधील मतमोजणीत उदयनराजे पहिल्यांदाच ३० हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर पडले आहेत. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पसरला असून जनतेचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. मागील २५ वर्षं सक्रिय राहून काम केलं, लोकांनीही भरभरून प्रेम दिलं – लोकशाही आहे.
पराभव झाला तर तो मान्य करावा लागेल असं म्हणत खासदारकी सोडण्याचा निर्णय चुकला असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साताऱ्यात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवार यांनी भरपावसात घेतलेल्या सभेचा चांगलाच परिणाम निवडणुकीवर झाल्याचं पहायला मिळालं. निवडणुकीच्या संपूर्ण निकालाची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला असून श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.