उदयन भोसलेंच्या मुलाचा अनोखा पराक्रम ; १४ व्या वर्षी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेचं प्रमाणपत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सकलेन मुलाणी

छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव वीरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या वर्षी या स्पर्धेत त्याने प्रमाणपत्र मिळवले आहे. वीरप्रताप आणि त्यांची आई दमयंतीराजे यांना स्कुबा डाईव्हचा चांगलाच छंद आहे. विरप्रतापच्या स्कुबा डाईव्हचा छंद पाहून त्याला अल्माज हिरानी यांनी शिकवायला सुरवात केली. थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत वीरप्रतापने उत्कृष्ट स्कुबा डायव्हिंगचे प्रमाणपत्र मिळवले. या स्पर्धेवेळी दमयंतीराजेही उपस्थित होत्या. वीरप्रतापच्या या यशाबद्दल उदयन भोसले यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. “मी माझ्या मुलाला असं तयार केलं आहे की, तो माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांची काळजी घेईल. स्कुबा डायविंग त्याचा छंद आहे, त्याने आज ही कामगिरी केली याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं भोसले म्हणाले.

उदयन भोसले यांना दोन मुलं असून मोठा मुलगा वीरप्रताप तर दुसरी मुलगी नयनतारा. वीरप्रताप हा सध्या चेन्नई येथे शिक्षण घेत असून मुलगी नयनतारा ही पुण्यात शिक्षण घेत आहे. या प्रसंगानंतर त्यांना शरद पवार यांचं ईडी भेट प्रकरण, अजित पवार यांचा राजीनामा या विषयी विचारलं असता त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं.