टीम हॅलो महाराष्ट्र : लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते, असे ट्विट करत भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते. pic.twitter.com/bQjeuTG2uh
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 14, 2020
उदयराजे यांनी आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर आज मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत त्यांनी या वादग्रस्त पुस्तकाचा चांगलाच समाचार घेतला.
तसेच त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच आहेत. कोणालाही जाणता राजाची उपमा देऊ नका, अशी उपमा देताना थोडा तरी विचार करा असे म्हंटले होते. पत्रकार परिषदेतून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ही टीका केली होती. आता त्यांनी ट्विटरवरून या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर टीका केली आहे. लोकशाही आहे म्हणून शांत आहे नाहीतर त्या गोयलला दाखवलं असतं राजेशाही काय असते, अशा शब्दात उदयनराजे यांनी वादग्रस्त पुस्तकाचे लेखक गोयल यांचा समाचार घेतला आहे.