मुंबई प्रतिनिधी : सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी-सेनेत आता निर्णायक हालचाली घडताना दिसत आहेत. गेल्या तासाभरापासून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात खलबतं सुरु आहेत. तसेच शिवसेननेने राष्ट्रवादीसमोर सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रितपणे सत्तास्थापन करणार या गोष्टीतला आता पुष्टी मिळताना दिसत आहे. असे झाल्यास काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर हे सरकार बनणार आहे. उद्धव-पवार यांच्या बैठकीत सरकार बनविण्याबात उद्धव यांनी पवार यांना विनंती केल्याचे समजते आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला दिलेल्या अवधीपैकी थोडाच वेळ बाकी आहे. तेव्हा आता नेमकं काय घडणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.