हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापुरातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाढी गावातील नागरिकानी आपल्या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडल्यानंतर त्यांनी देखील नागरिकांचे म्हणणं व्यवस्थित जाणून घेतल्यानंतर नागरिक खुश झाले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ आहेत अशा शब्दात नागरिकांनी मुख्यमंत्रांचे कौतुक केलं
नृसिंहवाडी मध्ये दरवर्षी महापूर येत आहे यापार्श्वभूमीवर जर हे पाणी आपण जत तालुक्याला वळवलं तर तिकडच्या लोकांना देखील फायदा होईल त्यामुळे हे पाणी तिकडे वळवा अशी मागणी नागरिकांनी केली तसेच ग्रामपंचायत साठी निधी मंजूर व्हावा असे निवेदन देखील देण्यात आले. यावर उत्तर देताना आतापण कायमस्वरूपी आणि ताबडतोब यावर उपाययोजना करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याने नागरिकांचे समाधान झालं.
CM Uddhav Balasaheb Thackeray assessed the damages caused by the floods at Nrusinhawadi in Kolhapur district. pic.twitter.com/jCwN2XCbI3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2021
त्यातील एका ग्रामस्थाने सांगितलं कि मुख्यमंत्र्यांना आम्ही जाताना हाक मारली आणि त्यांनी लगेच थांबून आम्हाला बोलण्याची संधी दिली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे असे ग्रामस्थांनी म्हंटल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असून महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहेत ते नक्कीच आमचं म्हणणं ऐकून घेतील असा आमहाला विश्वास होता आणि त्यांनीही आम्हाला योग्य प्रतिसाद देत योग्य ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे असं म्हणत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं