हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

Uddhav Thackeray BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर राज्यात मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं खुलं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुलं आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

दरम्यान, यावेळी त्यांनी घटना तज्ज्ञांनाही विनंती केली आहे आपण घटनातज्ञ आहात, त्यामुळे सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.