सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याप्रकरणी ठाकरे गट सुद्धा आता आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रिफायनरी साठी बारसूच्या जागेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच हिरवा कंदील होता असं त्यांनी म्हंटल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, नाणार येथे रिफायनरी होणार नाही म्हंटल्यावर बारसूच्या जागेसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामुळे त्यांनीच या जागेला हिरवा कंदील दिला आहे. मग त्यावेळेस त्यांनी कितवा कंदील का दिला? त्यावेळी विशिष्ट परिस्थिती होती का? का कोणत्या तडजोडी झाल्या होत्या का? असे एकामागून एक सवाल एकनाथ शिंदे यांनी केले.
💥 आता स्वस्तात मिळणार वाळू; राज्याचे नवं धोरण जाहीर 💥
प्रति ब्रास दर किती?👉🏽 https://t.co/TQB92ZbobL#Hellomaharashtra @RVikhePatil
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 26, 2023
खरं तर समृद्धी हायवेला सुद्धा सुरुवातील विरोध केला होता. मी खंबीरपणे आणि हिमतीने समृद्धी महामार्ग पुढे नेला आणि त्याला बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं नाव दिले. हा गेमचेंजर प्रकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आहे. चांगल्या कामाला विरोध करणं हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे. त्यांनी चांगल्या कामाला विरोध न करता चांगल्या कामाचे स्वागत केलं पाहिजे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.
दरम्यान, मुख्यमंत्री सुट्टीवर गेले अशा वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत त्यावरूनही एकनाथ शिंदेनी पलटवार केला आहे. लोक मला भेटायला आली , पुलांच्या कामाची पाहणी मी केली, अधिका-यांच्या बैठका घेतल्या यामुळं लोकांची कामं चांगली होतात मात्र ज्यांना अडीच वर्ष घरीच बसायचय ते टिका करत राहणार असं प्रत्युत्तर त्यांनी दिले