उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नितीश कुमार पॅटर्न राबवू पाहतायत, पण गणित जमेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सूर्य पूर्वेला उगवो किंवा पश्चिमेला.. आपल्याला त्याची काही फिकीर नसते… युती होवो किंवा न होवो… विचारसरणी बिचारसरणी असल्या गोष्टींचा थेट कोल्या करत परमनंट मुख्यमंत्री कसं राहायचं? याची कला फक्त देशात कुणाला जमली तर ती नितीश कुमार यांना… नितीश कुमार उर्फ नितेश बाबू… कुठल्या पक्षासोबत आणि किती वेळा मुख्यमंत्री पदाच्या शपथा घेतल्या असतील ते त्यांचं त्यांनाच माहित… त्यात इंडिया आघाडीची पहिली बैठक बोलवणारे हेच नितीश बाबू भाजपात गेले… सत्तेतील वाटेकरी झाले.. अनेक मलाईदार खाती त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतली… पक्ष मोठा केला… आणि बिहारमधली आपली ताकदही मजबूत केली… हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अगदी असाच काहीसा बिहारचा नितीश बाबू पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचाय तो उद्धव ठाकरे यांना… तो कसा आणि कधी? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव साहेबांनी नुकताच दिल्ली दौरा केला… यात त्यांनी मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणू गोपाल, राहुल गांधी अशा काँग्रेस हाय कमांड मधील नेत्यांच्या झाडून बैठका घेतल्या…. मागण्या दोन होत्या.. पहिली विधानसभेला जास्त जागा मिळाव्यात… आणि दुसरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा… पण काँग्रेस हायकमांडने अगदी आत्मविश्वासाने आलेल्या उद्धव साहेबांच्या हाती काहीच लागू दिलं नाही… नितीश कुमार जसे मुख्यमंत्री पदाला चिकटून आहेत.. अगदी तसंच काहीसं जागावाटप, निवडणूक, निकाल असं सगळं होण्याच्या आधीच मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलीये… संजय राऊतांची सकाळ सकाळी येणारी स्टेटमेंट देखील हेच सांगतात… की उद्धव ठाकरेंना काही केल्या येणाऱ्या विधानसभेत मुख्यमंत्री व्हायचंय…

Uddhav Thackeray यांना महाराष्ट्रात Nitish Kumar पॅटर्न राबवू पाहतायत, पण गणित जमेना

लोकसभेला काँग्रेसनं ठाकरेंसमोर नमतं घेतलं. त्यांचे सगळे हट्ट पुरवले. सांगलीसारखी पारंपारिक जागा सोडली. पण तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत सर्वात कमी स्ट्राईक रेटने रन ठाकरेंनी काढले… असा सगळा लोकसभेचा झालेला गेला बाजार इतिहास काँग्रेस हाय कमांडने ठाकरेंसमोर वाचून दाखवला… थोडक्यात ठाकरेंना बार्गेनिंग पॉवर करून जे मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यायचय… ते काही दिल्लीवारीत जमताना त्यांना दिसलं नाही… संजय राऊतांपासून ते शिवसेना ठाकरे गटातील सर्वच उत्सुक मंडळी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी उतावीळ आहेत… तसे अनेक स्टेटमेंट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही बोलून दाखवली… मुख्यमंत्र्याचा चेहरा डिक्लेअर करून मगच विधानसभा निवडणूक लढवाव्यात, या ठाकरेंच्या शिवसेनेची मागणीही काँग्रेस हायकमांडने रीतसर रित्या साईडलाईन केल्याचं बोललं जातय… काँग्रेसचं म्हणणं असं की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर भाजपच्या हाती आयतच कोलीत मिळेल… निवडणूक व्यक्तीकेंद्रीत होईल. त्याचा फटका आपल्या आघाडीलाच बसेल…

ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री हाच फॉर्मुला विधानसभेला पुढे कायम राहील, याचं जणू कन्फर्मेशनच काँग्रेसकडून मिळालय… थोडक्यात मोठा भाऊ छोटा भाऊ… असलं सगळं बाजूला सारून विधानसभेला जो चांगला परफॉर्मन्स करेल… जास्तीत जास्त आमदार निवडून आणेल… त्याचा मुख्यमंत्री असल्याने आता मुख्यमंत्रीपदाची घोषणा बैठकीत नाही तर निवडणुकीच्या रिंगणात होईल एवढं नक्की… नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलासोबत असोत वा भाजपसोबत, निवडणुकीआधीच ते मित्रपक्षांकडून मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करुन घेतात आणि आमदारांचा आकडा कितीही कमी असला तरी मुख्यमंत्रिपदी कायम राहतात. पण हा पॅटर्न ठाकरेंना जमलेला नाही….

बरं लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या ढीगभर चुका झाल्या… काँग्रेसनं सांगलीची जागा सोडली… पण तिथे काँग्रेसचा बंडखोर निवडून आला. तर ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला… रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, संभाजीनगरसारख्या जागांवर शिवसेना कमी पडली. अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती, अशा चुकांचा पाढाच काँग्रेसच्या नेत्यांनी वाचल्याचं कळतं… त्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री होण्याइतपत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची साधी सोपी नाही… हेच जणू ठाकरे यांना यातून उमगल असावं…बॉटम लाईन काय तर ठाकरेंना महाराष्ट्राचे नितीश कुमार बनायचंय… अगदी राजकारण इकडचं तिकडं झालं तरीपण मुख्यमंत्री व्हायचंय… पण बिहार साठी हे सोपं असलं तरी महाराष्ट्राची गुंतागुंत पाहता इथे ठाकरेंना ते तंतोतंत लागू पडणार नाही… एकतर महाराष्ट्रात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित दादा आणि आता शिंदे आपापले सत्ता केंद्र बनवून आहेत… त्यामुळे नितीश कुमार यांच्यासारखं राजकारण करायला महाराष्ट्र काही बिहार नाही…. एवढं मात्र सांगावं लागत…